ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

ठाणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॉस्पिटल नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे. ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागेएक चांगल्या कामांचा सपाटा लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी मोठी तरतूद केली आहे. ठाण्यातील जुन्या सिव्हील हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हे हॉस्पिटल तब्बल 900 खाटांचे इतकं मोठं उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी रखडलेली टेंडर प्रक्रिया पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यासाठी मंजूर झालेला 527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरल्याची माहिती समोर आली आहे.

गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पहिले जाते. त्यात या रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर, पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उच्च व उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: