दहावी-बारावी परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार! – अँड आशिष शेलार

राज्यात निर्माण झालेली कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहता दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या बद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार, अशी प्रतिक्रिया माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे व भीतीचे वातावरण होते. वारंवार लोकप्रतिनिधींंकडे याबाबत पालक चिंता व्यक्त करीत होते. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा न घेता तारखा तुर्तास पुढे ढकलण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर योग्य वेळी आँनलाईन व आँफलाईन अशा योग्य पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी भाजपातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली होती.

या मागणीचा विचार करून भारतीय जनता पक्षाची मागणी मान्य करुन तातडीने हा निर्णय घेऊन शिक्षणमंत्र्यांनी पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल भाजपकडून आभार मानले जात आहे अशी प्रतिक्रिया आमदार शेलार यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: