राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनतोय, आमदार भातखळकर यांची घणाघाती टीका !

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरवात केली आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाणही महाराष्ट्रात वाढलेले दिसून येत आहे. त्यात नालासोपारा येथील विनायका रुग्णालयात सोमवारी एकाच दिवशी सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली समोर आली होती. या रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे याच पार्श्वभूमीवर आमदार अतुल भातखळकर यांनी आघाडीवर टीका केली आहे.

नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळं सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे,

ढिसाळ व्यवस्थापन आणि अज्ञात कारणांमुळे उस्मानाबाद येथील ऑक्सिजन प्लांटची क्षमता गेल्या वर्षभरात निम्म्यावर आली आहे. थोडा वेळ टक्केवारी बाजूला ठेवून इथे लक्ष दिले असते तर करोना रुग्णांना ऑक्सिजन पूरवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली नसती,’असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: