ठाण्यातील त्या बड्या नेत्याचे सचिन वाझेशी काय संबंध, किरीट सोमय्या यांचे भाष्य

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आली.
आता या प्रकरणात नव-नवीन खुलासे होत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात ठाण्यातील एका नेत्याचे सचिन वाझे यांच्याशी आलेल्या संबंधावर भाष्य केले होते. त्यामुळे ‘हा’ नेता कोण अशी चर्चा होत होती.

आता एनआयए’च्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या संपूर्ण कटात सचिन वाझे यांच्यासह पाच ते सात जणांचा समावेश असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांच्या माध्यमातून पुढे येत आहे. त्यामुळे आता एनआयए’कडून मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाण्यातून आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

Team Global News Marathi: