अमरावतीत शिवसेनेचा एमआयएमला पाठिंबा, नव्या समीकरणाची सर्वत्र चर्चा

शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीला औरंगाबाद मतदार संघात सेनेचे उमेदवार खैरे आणि एमआयएमचे जलील यांच्यातील वाद अधिक उफाळून आले होते. मात्र आता चक्क शिवसेनेला एमआयएमला पाठिंबा दिल्यामुळे या नव्या समीकरणाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

त्यात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला प्रमुख शत्रू मानणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीत पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसने एमआयएमला थेट तर मायावतींच्या बीएसपीने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांनी बाजी मारली. या निवडणुकीत रासने यांना ९ मते मिळाली तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना ६ मते मिळाली.

त्यामुळे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने एमआयएमला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही होत आहे. यावर अद्याप शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्याने भाष्य केले नाही.

Team Global News Marathi: