ठाणे | प्रसुतीनंतरही पोट दुखायला लागले, तपासणी केली तर महिलेला बसला धक्का

 

ठाणे | सिझेरियन झाल्यानंतर महिलेच्या पोटात दुखु लागल्यामुळे तपासणी केली असताना महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात घडला आहे. या प्रकरणी महिलेने थेट डॉक्टरांविरोधात तक्रारीत दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यावेळी कपडा निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरसह चार जणांच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असलेल्या नामांकित रुग्णालय ज्युपिटर येथे ३१ वर्षीय मृण्मयी दिवेकर या बाळंतपणासाठी भरती झाल्या होत्या. त्यावेळी महिलेची प्रसूती सिझेरियन पद्धतीने करण्यात आली.

सिझेरियन झाल्यानंतर डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात दुखू लागले. वेदना असह्य होऊ लागल्यामुळे महिलेने ही बाब सर्जन डॉक्टर अशुतोष आजगावकर यांच्या वारंवार निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र आजगावकर यांनी औषध उपचार करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेची दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेदरम्यान सिझेरियन करते वेळी डॉक्टरने योग्य ती दक्षता न घेता निष्काळजीपणा केल्यामुळे चक्क महिलेच्या पोटामध्ये कापडी मॉप राहिलेले आढळून आले. या कपड्यामुळे महिलेच्या पोटामधील आतडी, अंडाशय तसंच अंडाशयाची उजवी नळी चिकटून गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचे निदान झाले. फक्त डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून वेळीच शस्त्रक्रिया करून निदान झाले नसते तर हा प्रकार मृण्मयी यांच्या जीवावर बेतू शकत होता. या प्रकरणी मृण्मयी दिवेकर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत रुग्णालयाचे प्रसूती करणारे सर्जन डॉ. आशुतोष आजगावकर तसेच त्यांच्या स्टाफवर टकराड दाखल करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: