ठाण्यात सेना-राष्ट्रवादीच्या भांडणात असंख्य शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

 

ठाणे : ठाणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात श्रेयवादावरून वाद होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे पण, ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी सेनेला राम-राम ठोकून भारतीय जनता पक्षाच्या जाहीर प्रवेश केला आहे.

महापालिका निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडीतील ठाण्यातील सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये श्रेयवादावरून आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असताना भाजप मात्र ठाण्यात पक्ष वाढीचे काम करत असल्याचे पाहायला मिळत सून येणाऱ्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि सेनेला जोरदार धक्का बसणार आहे.

ठाण्यात सेना-राष्ट्रवादीमध्ये चाललेलं राजकारण शिवसेनेत कार्यकर्त्यांची सुरू असलेली गळचेपी आणि काम करण्यासाठी मिळत नसलेली संधी याला कंटाळून आज शिवसेनेच्या बालेकिल्यातील शेकडो शिवसैनिकांनी भाजपची वाट निवडली. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.

Team Global News Marathi: