ज्यांना या भाषेविषयी शंका आहे, त्यांनी…; संजय राऊत यांचा विरोधकांना टोला

 

राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली होती राऊत यांनी टीका करताना थेट शिव्या वापरल्या होत्या यानंतर भाजपने संजय राऊतांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या आरोपांवर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असं ज्यांना वाटेत असेल त्यांनी खुशाल करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसंच, ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंताची पुस्तक वाचावी, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं आहे.

महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. ‘हजारो मारावे एक उरावा,’ अशा पध्दतीचं राजकारण काही भाजपाचे नेते करीत आहेत. अशा लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: