ठाकरे सरकारने वाटप केलेल्या भुखंडाना मुख्यमंत्री शिंदेकडून स्थगिती

 

मुंबई | तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असणारा वेदांता- फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची राळ उठली असून, राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान अशातच नवीन माहिती समोर आल्याने सत्तधाऱ्यांच्या वक्तव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे दिसून येत आहे.

दरम्यान 1 जून 2022 पासून औद्योगिक विकास महामंडळाने विविध स्तरावर वाटप केलेल्या भूखंडाच्या निर्णयाला पुनर्लोकोनासाठी उद्योग विभागात सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिवांचे पत्र news 18 लोकमतच्या हाती लागलय. 3 ऑगस्ट रोजीच्या या पत्रापासून आजतागायत भूखंडाचे प्रस्ताव धूळखात पडून असल्याचे यामध्ये दिसून येत आहेत. फॉक्सकॉन गुजरातला गेल्याच खापर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवरती फोडत असले तरी तत्कालीक सरकारच्या काळात उद्योगासाठी वाटप केलेल्या भूखंडाना स्थगिती दिल्याची माहिती मिळत आहे.

औद्योगिक विकास महामंडळाने विविध स्तरावरती वाटप केलेल्या भूखंडाला स्थगिती दिल्याने पुनर्वलोकनाच्या नावाखाली दीड महिन्यापासून हजारो कोटींची गुंतवणूक असलेले उद्योगांचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत, त्यामुळे उद्योग विश्वात नाराजीचा सूर असून मुंबई, पुणे, ठाण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 30 ते 40 हजार कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगारापासून महाराष्ट्र वंचित राहतो आहे.

Team Global News Marathi: