ठाकरे गटाला दिलासा | शिवसेनेच्या मालमत्तेसंदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली

 

शिवसेना पक्षाच्या मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात होता. शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडे पक्षाची असलेली संपत्तीही शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने ठाकरे गटाला सर्वोच्च दिसाला मिळाला.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांसह भाजपसोबत(BJP) राज्यात सत्ताही स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदेंना दिले. त्यानंतर शिवसेना भवन आणि पक्ष निधी कोणाचा याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, शिंदे गटाने आपण यावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण वकील आशिष गिरी यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने खळबळ उडाली होती. या याचिकेचा थेट शिंदे गटाशी काहीही संबध नव्हता.

याचिका दाखल करणाऱ्या वकील आशिष गिरी यांना न्यायालयाने या प्रकरणी फटकारले आहे. संपत्ती शिंदे गटाला द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा प्रश्न विचारत याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्ष निधी ठाकरे गटाकडेच राहणार आहे. हा तावरे गटासाठी मोठा दिलासा मनाला जात आहे.

Team Global News Marathi: