ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला शिंदे गटाचे खासदार, त्या बॅनरची होतेय जोरदार चर्चा

 

नाशकात शिंदे ठाकरे गटाचा वाद थांबला असला तरी अंतर्गत धुसफूस सुरूच आहे.त्यामुळे ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. मात्र इथं गणितच बिघडलं असून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने विकास कामांच्या उदघाटनाला थेट शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना निमंत्रण दिल्याने शहरभर या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा आहे.एकीकडे राज्यात ठाकरे शिंदे गट यांच्या जोरदार वाद सुरु आहे. हीच परिस्थिती स्थानिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सुरवातीपासून वादाची ठिणगी आहे. ही आग रस्त्यावर नसली तरी अंतर्गत सुरु असल्याचे दिसून येत असताना नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असलेल्या हर्षदा गायकर यांच्या प्रभागातील कामांच्या उदघाटनासाठी थेट हेमंत गोडसे याना पाचारण करण्यात आल्याने ठाकरे गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र हे काम खासदार निधीतले असल्याने हेमंत गोडसे यांना निमंत्रण दिलं असल्याचे स्पष्टीकरण संबंधित नगरसेविककेकडून देण्यात आले आहे.

नाशिकच्या डीजीपी नगर तीन क्रमांकमधील रस्त्यांचा काँक्रिटीकरण करणे, सीसीटीव्ही बसवणे असे विकासकामे खासदारांच्या विकास निधी मधून होत आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन होणार असल्याने या प्रभागात बँनरबाजी करण्यात आली आहे. या फलकांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटोसह दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे इतर नेत्यांचे फोटो आणि त्यानंतर खालील बाजूस शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे फोटो झळकलेले आहेत.

Team Global News Marathi: