भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजपासून दोन दिवस कोकणात

 

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने आता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोकणावर लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून दोन दिवस कोकणात तळ ठोकून राहणार आहेत. ते आज रत्नागिरी तर उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या दौऱ्यात भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघही सोबत राहणार आहे.

सध्याच्या घडीला कोकणात भाजपची राजकीय ताकद दिसून येत नाही. कणकवली इथे नितेश राणे यांच्या रुपाने भाजपचा एकमेव आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोकणात आपली राजकीय ताकद वाढवण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष घातले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

सध्या ठिकाणी शिवसेनेचे विनायक राऊत हे खासदार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप जोरदार तयारी करत आहे. यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा, आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा केला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मागील तीन महिन्यातला दुसरा तर प्रदेशाध्यक्ष म्हणून हा पहिलाच दौरा आहे.

Team Global News Marathi: