ठाकरेगट-वंचित युतीनंतर एमआयएमची आंबेडकर घराण्यातील या व्यतीसोबत करणार हातमिळवणी ?

 

मुंबई | एमआयएम राज्यातील मोठ्या दलित संघटनेशी आघाडी करण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने हात सोडल्यानंतर एमआयएम नव्या दलित संघटनेला सोबत घेणार असल्याची माहिती आहे. आंबेडकर घराण्यातील व्यक्तीलाच सोबत घेण्यासाठी एमआयएमचे प्रयत्न सुरू आहेत.प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्याशी एमआयएम आघाडी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

एमआयएमकडून आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिना दोन महिन्यांत रिपब्लिकन सेना आणि एमआयएमची आघाडी घोषित होण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या अंतर्गत सूत्रांनी माध्यमांना गोपनीय माहिती दिली आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दीवशी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा झाली होती या घोषणेनेनंतर शिवशक्ती आणि भीमशक्ती येणाऱ्या मनपा निवडणुकीला नवीन जादू दाखवणार दाखवणार अशी चर्चा सुरु असताना वंचित आघाडीचा जुना मित्र पक्ष MIM आता आनंदराज आंबेडकर यांच्या बरोबर युती करणार असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

Team Global News Marathi: