परमबीर सिंगांना अटकेपासून संरक्षण देण्यास ठाकरे सरकारचा नकार –

मुंबई : परमबीर सिंग यांच्या अटकेच्या शक्यतेवरुन अस्पष्टता दिसत आहे. सिंग यांच्या अटकेवरुन शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. परमबीर सिंग कुठे आहेत हे माहिती नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, याबाबत शाश्वती देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय. परमबीर सिंग कुठे आहेत माहिती नाही. ते समन्सना उत्तर देत नाहीत, असंही सरकारनं म्हटलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं हायकोर्टात म्हटलंय.

 

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंग यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंग यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलंय.

खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा २१ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.

परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक १४ महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: