ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलं; नितेश राणे यांनी साधला निशाणा !

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण करण्यात यावे म्हणून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून सरकार विरोधात आंदोलन केली जात आहेत. तर दुसरीकडे हॉंगकॉंग मध्ये खास प्रवाशांना झोपण्यासाठी खास बस सुरू करण्यात आल्याचा बातम्या प्रसारमाध्यमात झळकत होत्या, त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलं अशा शब्दांत निलेश राणे यांनी निशाणा साधला.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, जगात काय चाललंय आणि आपण महाराष्ट्रात काय करतोय?? हॉंगकॉंग शहरामध्ये झोपा काढायला बसेस चालू झाल्या आणि महाराष्ट्र मध्ये एसटी बस कामगार पगार वाढवून मिळावा म्हणून आंदोलन करत आहेत, मुंबईतली बीईएसटी पण व्हेंटिलेटरवरच आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं वाटोळं केलं अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

त्यातच दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना साद घालत भावनिक आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, आंदोलन करू नका अशी कळकळीची विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मात्र दुसरीकडे कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थिती नसलेले दिसून येत आहे.

Team Global News Marathi: