नितेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले उद्धव ठाकरेंची

नितेश राणेंची जीभ घसरली! म्हणाले उद्धव ठाकरेंची

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. उद्धव ठाकरे यांना दिवाळीपासून हा त्रास जाणवत होता. त्यांच्यावर आज गिरगावातील एच. एन. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. राज्य सरकारवर टीका करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारापणावरून टीका केली.

नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढला आहे की, या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.

टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली
मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला असल्याचे राणे यांनी म्हटले. नुसते ठाकरे लावले म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचे रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असे नितेश राणे यांनी म्हटले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: