ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना थेट आव्हान

 ठाकरे आणि शिवसेना ही नावं न वापरता जगून दाखवा; उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना थेट आव्हान

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे हिदुत्व याचा उल्लेख केला होता. तर आमदारांच्या संख्याबळावर त्यांनी हीच खरी शिवसेना असल्याचेही सांगितले होते. या दोन बाबींना धरुनच आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना खुले आव्हान केले आहे. ठाकरे आणि शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा असे त्यांनी म्हटल्याने आता भविष्यात या दोन शब्दाचा वापर शिंदे गटाकडून कसा केला जाणार हे पहावे लागणार आहे.

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर पक्ष प्रमुख तथा (CM Udhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आतापर्यंत त्यांनी चर्चेला या त्यावरून मार्ग काढू असे आवाहन केले होते. मात्र, आता मुख्यमंत्री हे अॅक्शनमोडमध्ये आहेत. शिवसेना पक्षावर दावा करणाऱ्या (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गटाला त्यांनी चोख उत्तर दिले असून ठाकरे आणि (Shivsena) राच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. बंडखोर आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे पक्ष संघटनेचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करीत आहेत. त्याच अनुशंगाने जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईनद्वारे सहभाग नोंदवला होता. जे सोडून गेले त्यांच्या बाबत अधिकचा विचार न करता आता पक्षाचे संघटन महत्वाचे असून माझी इच्छाशक्ती दांडगी आहे. त्यावर सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा प्रमुखांना दिला आहे.

ज्या दोन शब्दांचा वापर त्यावरच पक्ष प्रमुखांनी ठेवले बोट

आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाने केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, त्यांचे हिदुत्व याचा उल्लेख केला होता. तर आमदारांच्या संख्याबळावर त्यांनी हीच खरी शिवसेना असल्याचेही सांगितले होते. या दोन बाबींना धरुनच आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना खुले आव्हान केले आहे. ठाकरे आणि शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा असे त्यांनी म्हटल्याने आता भविष्यात या दोन शब्दाचा वापर शिंदे गटाकडून कसा केला जाणार हे पहावे लागणार आहे. आतापर्यंत केवळ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाला समोर करुन बंडखोर आमदार आपली भूमिका मांडत होते. त्यावरच उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिल्याने आता शिंदे गटाची कोंडी होणार के पहावे लागणार आहे.

लोंकामध्ये वावरा मग किंमत समजेल

आतापर्यंत शिवसेनेचा आणि ठाकरे नावाचा वलय होता. याचा विसर आमदारांना पडला आहे. सध्या ज्या भूमिकेत बंडखोर आहेत त्यामागे मोठ्या पक्षाचा हात आहे. मात्र, तेथेही भविष्य दिसत असेल तर खुशाल जावा पण माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिले आहे. जिल्हा प्रमुखांची बैठक असली तरी मुख्यमंत्र्यांचा रोष मात्र बंडखोर आमदारांवर होता हे काही आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता सर्व काही स्पष्ट झाले असून पक्ष प्रमुख हे संघटना मजबुतीकऱणासाठी रिंगणात उतरले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: