“आदित्यला ‘बडवे’ म्हणायचं आणि स्वतःचा मुलगा खासदार; उद्धव ठाकरे संतापले

 

माझ्या कुटुंबीयांवर आणि मातोश्रीवर ज्यांनी घाणेरडे आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. मी शांत आहे पण षंढ नाही. ज्यांची स्वप्न होती ती आपण आजवर पूर्ण केली. पण आणखी काही स्वप्न असतील तर त्यांनी जावं. शिवसेनेची मूळं आजही माझ्यासोबत आहेत, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन संवाद साधला.

काही लोक सांगतायत की, माझ्या आवतीभोवती असणाऱ्या बडव्यांचा त्रास होतोय. आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे चालतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे हणाले की, तुम्हाला तुमच्या मुलाला मोठं करावसं वाटतं मग मला वाटणार नाही का?, असा , सवाल उपस्थित करत या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता डोक्यात हाणणार, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं हिंमत माझ्या रक्तात आहे.

Team Global News Marathi: