..तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा खुलासा

 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राज यांचा मुन्नाभाई असा उल्लेख केला. त्यावरून आता मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तुम्ही ज्या मार्गाने सत्ता मिळवली त्याचं समर्थन केले ते योग्य नाही. माणसाचा स्वभाव असतो तो जात नाही.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, टोमणे मारणं हे प्रकार सुरु होते. संजय राठोड, यशवंत जाधव या प्रकरणावर काहीही बोलले नाही. ज्या लोकांनी भाजपा-शिवसेना युती केली. त्यात प्रमोद महोजन, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे होते. पण आता तुम्ही युतीत सडलो बोललात म्हणजे बाळासाहेब चुकीचे होते असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं का? असा सवाल मनसे प्रकाश महाजन यांनी सवाल केला.

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं. मुन्नाभाई गांधींजीचा अभ्यास करतो म्हणून त्याला गांधी दिसले. बाळासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाली तरी तुम्ही कधी त्यांना दिसल्याचं बोलला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वेगळं नातं होतं. आज पुत्रप्रेमाचा डंका ते वाजवत आहेत. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे दिसत असतील तर केमिकल लोचा कसा? असं त्यांनी सांगितले.

तसेच २६ जुलै २००५ रोजी ज्यावेळी मुंबईत महापूर आला तेव्हा उद्धव ठाकरे पत्नी मुलांसह हॉटेलला राहायला गेले. तेव्हा बाळासाहेबांना कुठे सोडलं होते? तेव्हा बाळासाहेब मोठ्या हक्काने कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे राहायला आले होते. गुरु-शिष्य अशी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचं नातं होते. ही आठवण सांगितलेली राज ठाकरेंना आवडणार नाही, मी त्यांचा ओरडा खाईन पण हे सांगायला हवं. पण ही सत्य घटना आहे. डंका पिटून हिंदुत्व होत नाही असा गौप्यस्फोट प्रकाश महाजनांनी केला.

Team Global News Marathi: