आमचं हिंदुत्व असली आणि तुमचं नकली हे ठरवण्याचा अधिकारी मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्हाला कोणी दिला – सतीश नारकर

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकरपणे हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका केली जातीये. यातच काल शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपल्या सभेत राज ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्या टीकेला आता मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आमचं हिंदुत्व असली आणि तुमचं नकली हे ठरवण्याचा अधिकारी मुख्यमंत्री महोदय साहेब तुम्हाला कोणी दिला ! एकीकडे हिंदुत्वादाच्या बड्या-बड्या बाता मारायच्या आणि आयुष्यभर ज्यांनी प्रभू श्री रामाच्या अस्तित्वावर संशय घेतला आणि राम लल्लाच्या मंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत सत्तेचा उपभोग घ्यायचा याला कोणतं हिंदुत्व म्हणायचं !! असा टोला त्यांनी लगावला.

शनिवारी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुन्नाभाई म्हणून उल्लेख केला या टिकेनंतर मनसे सैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर तुटून पडली होती आज ज्या काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने आयुष्यभर प्रभू श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले  तसेच अयोध्या येथे राम जन्मभूमीत राम मंदिर बांधण्यास कडाडून विरोध केला आज त्यांच्या मांडीला-मांडी लावून सत्ता उपभोगताना शिवसेनेच्या हिंदुत्वाची धार कमी झाल्याची टीका आता विरोधकांकडून होऊ लागली आहे.

Team Global News Marathi: