तहसिलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट्रचाराची चौकशी करण्यासाठी सरोदे यांची एसीबीकडे तक्रार !

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्महत्येची धमकी देणाऱ्या तसेच लोकप्रतिनिधीवर गंभीर स्वरूपाचे आरोप लावणाऱ्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी अपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली आहे.

या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालात देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कुठलेही सरकारी शुल्क भरून न घेता ती वाहने सोडून दिली असा आरोप त्यांनीं लगावला होता.

तसेच अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याच्या बाबी अहवालात नमूद आहेत. देवरे यांची बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पोटघन यांची आहे अशी माहिती सरोदे यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: