काँग्रेसची मोडकळीस आलेली माडी पवारांनी कधीच सोडली, दानवेंचा काँग्रेसला जोरदार टोला !

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर केलेल्याटिकेचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेऊन पुन्हा काँग्रेसमद्ध्ये येण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे खुले आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले होते.

आता थोरात यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेब थोरात यांचे विधान हास्यास्पद असून काँग्रेसची मोडकळीस आलेली माडी पवारांनी कधीच सोडली अस म्हणत टोला लगावला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भांडणात या दोन्ही पक्षाला टोला लागवण्याचे काम करत आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आताही पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, अस म्हणत बाळासाहेब थोरातांची ऑफर हस्यास्पद आहे अशी टीका दानवे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: