चहाच्या अतिसेवन केल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

 

मुंबई | आपल्या भारतीय संस्कृतीत दिवसाची सुरूवात चहाने केली जाते. तसेच अनेकांना दिवसातून 4-5 वेळेस चहा लागतो. थकवा असेल किंवा डोकेदुखी त्यावरचा रामबाण उपाय म्हणून चहाकडे पाहिलं जातं. पण हाच चहा आरोग्यासाठीही घातक आहे. चहाच्या सततच्या सेवनाने त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवायला लागतात. एक कप चहामध्ये जवळपास 60 ग्रॅम कॅफीन असतं.

या कॅफीनचं अती सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. चहाचं अतिसेवन झालं तर चहामध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे तुम्हाला चक्करही येऊ शकते. अति प्रमाणात चहाचं सेवन केलं किंवा उपाशीपोटी चहाचं सेवन केलं तर अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. चहात असणारं कॅफीन हे अॅसिडिक असतं. चहाचं रिकाम्या पोटी किंवा अतिसेवन केलं तर शरीराचं अॅसिडीक बॅलेन्स बिघडतं. त्यामुळे तज्ज्ञ उपाशीपोटी चहा न पिण्याचा सल्ला देतात.

चहामध्ये टॅनिनचे प्रमाणही आढळून येते. चहाचं अतिसेवन झालं तर टॅनिनमुळे शरीराची लोह शोषण क्षमता आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही कमी होते. चहा चवीला चांगला लागला तरी त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होतात त्यामुळे चहाचं प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यापूर्वी सुद्धा चहाच्या अतिसेवनामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम समोर आले आहे.

Team Global News Marathi: