अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

ग्लोबल न्यूज : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मंचर तालुक्यातील मंचर घोडेगाव रस्त्यावर सोमवारी सकाळी हा अपघात झाला.

एकनाथ बबनराव नाईक (वय 47) आणि संगीता एकनाथ नाईक (वय 42) असे मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाईक दाम्पत्य हे दुचाकीने कोशिंबीग गावाच्या हद्दीतील भीमाशंकर हॉस्पिटल समोरून जात असताना हा अपघात झाला. मूळचे नारोडी येथील रहिवासी असलेले नाईक दांपत्य काही कामानिमित्त चाकण येथे राहतात. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे ते गावी आले होते.

दरम्यान अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. मंचर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: