टायगर श्रॉफ-दिशा पटानीचं ब्रेकअप, तब्बल ६ वर्षांनी संपवल नातं

 

मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही अनेकदा इव्हेंट तसेच कार्यक्रमात एकत्र दिसायचे. अनेकदा दोघेही मालदीवमध्ये जाऊन एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करायचे. मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाहीत. रिपोर्टनुसार ६ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघे वेगळे झाले आहेत.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे चित्रपट सृष्टीमधील आवडत्या कपलपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. पण आता दिशा आणि टायगर जोडी म्हणून एकत्र दिसणार नाहीत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार टायगर आणि दिशा यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या दोघांनी कोणतीच गोष्ट जगजाहीर नाही केली.

दिशा आणि टायगरने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे खरे कारण समोर आलेले नाही.हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, ब्रेकअपमुळे टायगरला त्याच्या कामात काही फरक पडू दिला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. टायगर सध्या लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

औरंगाबाद नामांतर याचिकेवर १ ऑगस्टला होणार सुनावणी !

‘बाळासाहेबांच्या सून हे लक्षात ठेवून पुढे वागावं’, स्मिता ठाकरे-शिंदे भेटीवर सेना नेत्याचं सूचक विधान

Team Global News Marathi: