..तर, वेदांता पुन्हा येऊ शकतो; रोहित पवारांचं सूचक विधान

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहे. हा प्रकल्प पुन्हा राज्यात कसा आणला जाईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, हा प्रकल्प पुन्हा राज्यात येऊ शकतो असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानं राज्याच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचे त्यांनी म्हटले असून, अद्याप वेदांताला गुजरातमध्ये प्रकल्पासाठी कोणतीही जमीन मिळालेली नाही. तसेच कोणतीही जमीन आवडलेली नाही. मिविआ काळात वेदांताला तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, त्यांना ती जागा आवडली देखील होती. यासाठी संबंधित कंपनीला अनेक सोयी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेला.

मात्र, जरी हा प्रकल्प गुजरातला गेलेला असला तरी, अद्यापपर्यंत वेदांताला गुजरातमध्ये कोणतीही जमीन पसंतीस पडलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा राज्यात येऊ शकतो, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: