…तर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालीन’, नितेश राणेंनी पोलिसांनी धमकी

 

परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालणार आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. लोकांच्या उपस्थिती सांगतोय, काही होत नाही. खूप एसपी, बिसपी खूप पाहिले. माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, असा दमच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सातारा पोलिसांना भरला. तसंच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली.

साता-यातील पाटण तालुक्यात मंगळवारी झालेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात आमदार नितेश राणे यांनी सहभाग घेतला होता. या वेळी नितेश राणे यांनी सातारा पोलिसांनाच आव्हान दिले. ‘आम्हाला परवानगीबद्दल विचारात बसायचं नाही. पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेव्हा मोर्चा काढणार, पाहिजे तेव्हा घर जाणार. आम्हा लोकांना विचारायचं नाही.

सांगून जातो इथून, परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालणार आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. लोकांच्या उपस्थिती सांगतोय, काही होत नाही. खूप एसपी, बिसपी खूप पाहिले. पण राजकारणात काही होती नाही. उगाच आम्हाला हिंमत दाखवायची नाही, पकडा त्या अनधिकृत धंद्यावाल्यांना त्यांना पकडून दाखवायचे, तुम्हा जे काही मेडल हवे आहे, ते सरकारमधून मिळवून देऊ. पण उगाची सिंघमगिरी माझ्यासमोर करू नका, असा दमच नितेश राणे यांनी पोलिसांना भरला.

Team Global News Marathi: