आमचे सरकार फेसबुक सरकार नाही तर… ; चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला

 

राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्रितपणे सरकार स्थापन केले. यानंतर विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका करण्यात येते. नुकताच महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांवर थेट दावा सांगितल्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आता खासदार संजय राऊत यांना फटकारले आहे.

आमचे सरकार फेसबुक सरकार नाही तर लोकांच्या फेसवर स्माईल आणणारे सरकार आहे असा टोला वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सीमाभागातील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे अशी टीका सातत्याने या सरकारवर केली जात आहे. यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपापले पक्ष सांभाळावेत अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर सीमावादावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद सोडवण्यास आमचे सरकार सक्षम आहे, असेही वाघ म्हणाल्या.

Team Global News Marathi: