…तर ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात होणार नाही” वसंत मोरे यांची सूचक पोस्ट

 

आमदार रमेश लटके य़ांच्या दुर्देवी निधनानंतर अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं त्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. त्याबाबत मनसेचे निष्ठावंत नगरसेवक वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांच्या समोरील मुख्यमंत्री ही पाटी आणि शेजारीच राज ठाकरे असा फोटो शेअर केला आहे. त्यावेळी मोरे यांनी राज ठाकरेंवरील प्रेम पुन्हा दाखवून दिले आहे. भविष्यात आमच्या साहेबांच्या खुर्ची समोर असणारी ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात तरी होणार नाही. असा विश्वास त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

मोरे म्हणाले, साहेबांनी अंधेरीच्या निवडणुकीसंदर्भात भाजपाला जे आवाहन केले आहे. ते जर भाजपाने मान्य केले तर भविष्यात आमच्या साहेबांच्या खुर्ची समोर असणारी ही पाटी हलवण्याची कोणाची हिम्मत महाराष्ट्रात तरी होणार नाही.अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी मनसे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपलं मत कळवलं आहे.

Team Global News Marathi: