.तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू; पंढरपूरवासियांचा मोठा निर्णय

 

पंढरपूर कॉरिडोरच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. याच मुद्यावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर उद्ध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू असं अश्वासन सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिले. यानंतर सोमवारी पंढरपूरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचा ठाराव मंजूर करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंढरपूरमधील कुठल्याही नागरिकाच्या घराला धक्का न लावता, कोणाचेही विस्थापन न करता पंढरपूरचा विकास करू, असं अश्वासन दिले. त्यामुळे जर त्यांनी आपलं अश्वासन पाळलं, कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू अशी घोषणा या बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

पंढरपूर कॉरिडोरच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती, संतभूमी बचाव समिती तसेच सर्वपक्षीय बैठक पंढरपूरमध्ये पार पडली. या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. सध्या तरी पंढरपूर कॉरिडोरला स्थानिकांचा मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकार आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Team Global News Marathi: