“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा

 

गोवा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आता याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी शिवसेनेला नोटा (नोटा) ला जेवढी मतं पडतात, तेवढीच मतं मिळणार असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे आम्हाला माहिती आहे. तसेच संजय राऊत यांनीही पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची पाहावी, आपण बोलतो किती याचा विचार करावा, असा प्रति टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत

गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल, असं राऊत म्हणालेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून तिकडे गेले आहेत. फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला. काल एका मंत्र्याने पक्षाचा त्याग केला. भाजपचे आमदार प्रविण झाटे यांनींही पक्ष सोडला. त्यांनी पक्षातील युद्ध जे सुरु आहे, त्याची लढाई करावी, असंही ते म्हणालेत.

Team Global News Marathi: