मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः हातात सूत्र घेत प्रवीण दरेकरांना दिला जोरदार धक्का

 

मुंबई | मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्र शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: च्या निवडणुकीची हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मतं मिळाली आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.

मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.

 

Team Global News Marathi: