स्वयंघोषित राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता आंधळे आणि शिंदे गटाचं कनेक्शन समोर येतंय, शिंदे गटाच्या अडचणी वाढणार ?

 

हिंदू धर्मातील देवी-देवता आणि संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानांवरून महाराष्ट्रात सध्या वाद निर्माण झालाय. वास्तविक हा व्हिडिओ २००९ मधील असून त्याचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नव्हता, तसेच २००९ पासून या व्हिडिओवर व्यक्त न होणारी राजकीय स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी सध्या व्यक्त होताना दिसत आहेत.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध काही वारकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यात मोजकेच लोकं दिसत असले तरी त्यांना प्रसिद्धी देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. एकूण विषय पुरस्कृत असल्याचं म्हटलं जातंय. आज ठाण्यात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. यानिमित्ताने ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.
‘हिंदुत्व संपवण्याचा विडा उलचलेल्ल्या निर्बुद्ध बाईने छळ मांडला आहे,’ असा आरोप करत भाजपच्या जवळील राजकीय वारकरी संघटना सुषमा अंधारेंविरुद्ध आक्रमक झाल्या आहेत.

सुषमा अंधारेंच्या वक्तव्याविरोधात डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या मोर्चाला मनसेनं विरोध केला आहे. सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणं चुकीचं असल्याची भूमिका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडत या बंदला विरोध केला. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध मात्र बंद करून जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे. हा बंद मागे घ्यावा असाच बंद छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना का केला नाही असा प्रतिसवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी करत डोंबिवली बंदला विरोध केला आहे. त्यामुळे हा बंद कितपत यशस्वी होईल याबाबत शंका आहे.

स्वयंघोषित यु-ट्युब कीर्तनकार सुनीता आंधळे यांचे मानस भाऊ हे शिंदे गटाचे जिल्हापरिषद सदस्य असून ते कोपर्डी आणि शिर्डी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत. युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे या स्वयंघोषित यु-ट्युब कीर्तनकार सुनीता आंधळे यांना कोणी राजकीय सुपारी देऊन, ते व्हिडिओ स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमार्फत बातम्यांमध्ये आणले जातं आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच भाजप आणि शिंदे गटाशी संबंध असलेले राजकीय १०-२० स्वयंघोषित कीर्तनकार आणि वारकरी दिंड्या काढून ‘राज्यभर मोठ्याप्रमाणात” असे स्पॉन्सर मथळे छापण्याचे बालिश राजकीय प्रकार मागील २-३ सूर झाले आहेत.

तसेच अनेक युट्युब कीर्तनकार फॉलोवर्स वाढावे म्हणून हे प्रकार करत असून त्यात शहाणी प्रसार माध्यमं देखील फसत आहेत हे आश्चर्य म्हणावं लागेल. सुषमा अंधारे यांच्या २००९ मधील व्हिडिओवर अनेक स्वयंघोषित युट्युब कीर्तनकार तसेच राजकीय वारकरी स्वतःचे फॉलोवर्स वाढविण्यासाठी २०२२ मध्ये धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय आणि प्रसार माध्यमं ते स्थानिक प्रतिनिधींच्या मार्फत आंधळेपणाने छापून आणत आहेत.

 

Team Global News Marathi: