बाबासाहेबांच्या जन्मस्थळाबाबत वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर राऊतांचा घणाघात

 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असे म्हटले होते. दरम्यान,याच वक्तव्याचा चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे समाचार घेतला आहे. संजय राऊतांविषयी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, बाबासाहेबांचा जन्म झाला. तेव्हा भाषिक राज्यांची निर्मिती झाली नव्हती. तेव्हा फक्त मुंबई प्रांत होता. त्यामुळेच बाबासाहेब हे महाराष्ट्राचे सुपूत्र ठरत नाहीत का? असा सवाल करतानाच भाजपच्या नेत्यांचा मेंदू किड्यामुंग्यांचा झाला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली.

माझं विधान काय आहे? त्यात अपमान काय आहे? काही भाजपच्या लोकांचे मेंदू किड्यामुंग्याचे आहेत. दुर्देवाने असं म्हणावे वाटते. घटनाकार बाबासाहेबर आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्रं नाहीत का? त्यांचा जन्म या देशातच झाला. बाबासाहेबांचा जन्म 1891मध्ये महू येथे झाला होता. महू सध्या मध्यप्रदेशात आहे. तेव्हा मध्यप्रदेशात नव्हतं. भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करा, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी चित्रा वाघ यांना दिलं.

Team Global News Marathi: