स्वातंत्र्यवीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते – मोहन भागवत

 

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी वीर सावरकराच्या संसदेत लावलेल्या तसबिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी वीर सावरकरांबाबत महत्त्वाची विधाने करण्यात आली. स्वातंत्रवीर सावरकर हे मुस्लिमांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्यात. वीर सावरकरांबद्दल आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत त्यांना सावरकर आवडत नाही. सावरकरांचा असा विश्वास होता की, राष्ट्रीयत्व त्यांच्या उपासनेच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करत नाही आणि ते हिंदू राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांबद्दल बोलू नका. हिंदुत्वाचे सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व असे वर्णन करणे ही आता एक फॅशन आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील, असे मोहन भागवत यांनी कार्यक्रमात बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: