हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

परभणी – अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी तसेच ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या असलेल्या सर्वच पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापसाला मोड फुटले आहेत. अनेक भागात सोयाबीन सडले आहे. त्यामुळे काढणी देखील करता येत नाही.नैसर्गिक संकटामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.

तसेच शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, भगवान शिंदे, शेख जाफर, दिगांबर पवार, केशव आरमळ, मधुकर चोपडे, अमृत खटींग, बाळासाहेब घाटोळ, रामा शेळके, संतोष पोते आदींनी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील दिला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: