“‘स्वाभिमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना”

 

चालू हंगामात कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार होणारी रक्कम अधिक पाचशे रुपये द्यावेत. गळित हंगाम संपल्यानंतर उर्वरित ५०० रुपये न दिल्यास कायदेशीर लढाईने ऊस उत्पादकांना पाचशे रुपये मिळवून देऊ, असा एल्गार धनाजी चुडमुंगे यांनी केला होता. तसेच यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवेरे टीका सुद्धा केली होती. स्वाभिमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना असल्याचा आरोपच चुडमुंगे यांनी केला होता.

चुडमुंगे म्हणाले, ‘‘गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसास एफआरपीची रक्कम अधिक २०० रुपये, कायदेशीर लढाई केल्यास मिळणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या नेत्याने कोणताही आवाज उठवला नाही. जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यास तयार आहेत, हे यश आंदोलन अंकुशने केलेल्या कायदेशीर लढाईमुळे शक्य झाले आहे.

तसेच एकरकमी रक्कम १४ दिवसांत न दिल्यास पंधरा टक्के व्याज द्यावे लागणार आहे. यामुळेच कारखाने एकरकमी एफआरपीची रक्कम देत आहेत. भविष्यात नीती आयोगाचे अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर लढाई करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: