‘आज तेरा वक्त है कल मेरा आयेंगा’ म्हणत छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा

 

नांदेड  | अडीच वर्षे मला जेलमध्ये ठेवलं कारण मी बोलतो म्हणून, पण आता ही गप्प राहणार नाही. बोलतच जाणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातो. आज तुमची वेळ आहे. उद्या आमची येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. ते देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शायरी करत भाजपाला इशारा देत भुजबळ म्हणाले, ये वक्त है बदल जाता है. आज तेरा वक्त है. कल मेरा आयेंगा. हम ना बदलेंगे. वक्त के रफतार के साथ जब भी मिलेंगे रफतार वही होगी असं त्यांनी बोलून दाखविले होते.

पुढे अशोक चव्हाण यांच्यावर आरोप लगावून नांदेडला येणार असल्याच्या मुद्द्यावरून बोलताना भूजबळ म्हणाले की, किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा. पण त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना तुमच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा, असं म्हणत भाजपा सरकारमध्ये असताना किती घोटाळे झाले याची यादीच भुजबळ यांनी सभेत वाचून दाखवली.

यावेळी भाजप नेत्यांच्या घोटाळ्याबद्दल सोमया का बोलत नाही, असा सवाल करत भुजबळ म्हणाले, अजित पवार यांनी आज भाजप संबंधित साखर कारखान्याची यादी दिली. सोमय्या तिकडे जा की.महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी त्रास दिला जातोय. अजित पवार यांच्या तीन बहिणीच्या घरावर छापे टाकले हे सगळं तोंड बंद करण्यासाठी चालले आहे.

Team Global News Marathi: