निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे अनेक धक्कादायक आरोप

 

मुंबई | माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी वसूलीचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोग गठीत केला आहे. यावेळी न्यायमूर्ती चांदीवाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत निलंबीत निरीक्षक सचिन वाझे यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.

सचिन वाझे यांनी ‘राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणजेच एनआयच्या कोठडीत असताना आपला छळ करण्यात आला. तसेच आपल्याला अपमानित करून जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली’ असे आरोप केले आहेत. यामुळे आपण अजूनही मानसिक धक्क्यात असल्याचंही वाझे यांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.

सचिन वाझे यांनी सुनावनी दरम्यान एनआयवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी यावेळी सांगितलं, ‘यावेळी कोठडीतले दिवस माझ्यासाठी सर्वात जास्त मानसिक त्रास देणारे होतेच शिवाय एएनआय त्या 28 दिवसांच्या छळ, अपमान, मानसिक त्रासासाठी कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी एनआयवर केला आहे. वाझे यांनी मला जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सही करायला लावल्याचा आरोप केला होता. ती कादपत्रे अजूनही मला देण्यात आली नसल्याचा आरोपही वाझे यांनी केला आहे

Team Global News Marathi: