मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

 

राज्यात आघाडीचे साकार स्थापन झाल्यापासून विरोधात सत्तेत असलेल्या सर्वच पक्षावर ईशान साधताना दिसून येत आहेत. त्यातच या तीन पक्षात स्थानिक पातळीवर होत असलेल्या वादावादीचे विरोधक पुरेपूर फायदा घेताना दिसून येत आहेत. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला आहे. तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करताना पाटील बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळवत भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यातील यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षचिन्हावर लढविणार आहोत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी सग्यासोयऱ्यांची काळजी न करता पक्षहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे अनेकांचे डावपेच उधळून लावत चार जागांवर विजय मिळाला. ज्यांचा पराभव झाला त्यांना ताकद दिली जाईल.

Team Global News Marathi: