गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहेत

 

शिंदे गटाच्याबंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक सुरु झाल्याचे चित्र दिसून येत असून पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग केली. अंधारे यांनी पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना खडेबोल सुनावले. त्या धरणगावात बोलत होत्या .

गुलाबराव पाटील गद्दारीचा शिक्का घेऊन फिरत आहे.. मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते आणि तुम्ही माझा बाई असा एकेरी उल्लेख करता? ही कोणती पद्धत आहे? असा संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्या धरणगावात बोलत होत्या. धरणगावात 25 दिवस पाणी सुटत नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. पण ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लासात घेण्यात येणारे पाणी आहे, याचा शोध घ्यायला हवा, असा टोला अंधारे यांनी पाटलांना लगावला.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण त्यावर पाटील चार शब्द सुद्धा बोलले नाही. त्यावर बोलण्यासाठी अभ्यास असायला हवा ते कसे बोलतील? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावरून राज्य सरकारवरही सुषमा अंधारे यांनी जोरदार ताशेरे ओढले.

Team Global News Marathi: