सुषमा अंधारें लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश

 

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून जोरदार आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हा प्रवेश मला काय देणार, असा अनेकांचा प्रश्न असेल. आता काय द्यायचं आणि काय घ्यायचं? हा मुद्दाच नाही. शिवसेनेकडून आता काही आपेक्षाही नाहीत. अजिबातच नाहीत. आता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की, मी शिवसेनेला काय देऊ शकते. मी काय करु शकते? चांद्यापासून बांद्यापर्यंत जो शिवसैनिक भरकटला आहे. या शिवसैनिकांमध्ये मी कशी एक नवी उमेद जागी करु शकते, हे महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी दिली.

स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? तर काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

टीएमसीचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुन चक्रवर्ती यांचे खळबळजनक विधान

Team Global News Marathi: