सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना पोस्टमन म्हणत डिवचले

 

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी महाशक्तीला पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माघारी बोलावण्याची मागणी करावी, असा सल्ला अंधारे यांनी ठाकरेंना दिला. सुषमा अंधारे या पुण्यात बोलत होत्या.हल्ली खूप पोस्टमन झाले आहेत. पोस्टमन असणारे लोक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात एक पत्र महाशक्तीला लिहावे . कोश्यारींना परत बोलवा म्हणून ते पत्रं का लिहीत नाही? म्हणजे पोस्टमनचे पत्र लिहिणंही स्क्रिप्टेड आहे काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही अंधारे यांनी निशाणा साधला. एक बाई चंद्रकांत दादांची ज्योतिबा फुलेंसोबत बरोबरी करते. खुटाने कुठं उंटाचा मुका घ्यायचा असतो का? असे म्हणत अंधारे यांनी वाघ यांच्यावर ताशेरे ओढले. अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. माझं 15 वर्ष जुनं प्रकरण बाहेर काढून त्यावर काही लोक बलोत आहे. पण बागेश्वर बाबाच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून माझ्याविरोधात आंदोलन करणारे सगळेच चुप्पी साधून आहेत, असे अंधारे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅम्पनिंगमध्ये तीन टप्पे आहेत. डॅमेज, होप आणि अ‌ॅ क्शन यावर त्यांचे राजकारण सुरु आहेत. पंडित नेहरूंवर बोलून देखील मोदींना नेहरूंना डॅमेज करता आलं नाही. महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही डॅमेज करता येत नाही. महापुरुषांवर बोलणं म्हणजे जीभ घसरली. चुकून बोललो असं नाही. हे लोक ठरवून बोलतात. ठरवून डॅमेज करतात. महापुरुषांना जाणीवपूर्वक डॅमेज केले जात असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: