सुषमा अंधारेंची तोफ पुन्हा धडाडणार ; औरंगाबादमध्ये सत्तार-शिरसाठ-भुमरें विरोधात सभा

 

औरंगाबाद | एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पक्षाच्या उभारणीसाठी आपल्या शिलेदारांना घेऊन मैदानात उतरले आहे. शिंदे गटातील बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात ठाकरे गटातील नेते आपली ताकद दाखविणार आहेत. त्री संदीपान भुमरे यांचा गड मानल्या जाणाऱ्या पैठण नगरीत येत्या १८ नोव्हेंबर रोजी सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे.

सुषमा अंधारे पहिल्यांदाच पैठणमध्ये सभा घेत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मनाला जातो. याठिकाणाहून एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहा आमदार सामील झाले आहे. ठाकरेंसाठी हा सर्वांत मोठा धक्का होता. औरंगादेतील पडझड रोखण्यासाठी आणि बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी ठाकरे गटाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून अंधारे भुमरेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेत आहेत.

याअगोदर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही औरंगाबाद येथील बंडखोर नेत्यांच्या मतदार संघात सभा घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत त्यांच्यावर सडकून टीका केली होती. आता येत्या १८ नोव्हेंबर रोजी भुमरेंच राजकीय गड समजल्या जाणाऱ्या पैठण येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती पैठण तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: