या सरकारचा दरारा नाही, काय वाटेल ते सुरू आहे

 

राज्यात सरकारचा दरारा राहिलेला नाही. बैलगाड्यांच्या शर्यतींत गोळीबार होतो. कोणीही काहीही गलिच्छ बोलतात.जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन-दोन वेळा गुन्हे दाखल होतात. हे सगळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चिन्ह असून, राज्याला ते परवडणारे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झाले.

पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी असे करू नये म्हणून त्यांना सांगणार आहे. राजकारणात चढ-उतार येत असतात. आरोप होतात, टीका होते, त्याचा अर्थ ते सगळं खरं असतंच असं नाही. खुद्द पवार साहेबांवर कितीतरी आरोप झाले. आव्हाड यांच्याबाबतीत नक्की काय झाले, याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी. ते संविधान बचाव मोहिमेत असतात. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगतात. त्यांना अटक कशी होते. कलमे कोणती लावतात. हे सगळे पोलिस कोणाच्या तरी सांगण्याने वागतात, असे वाटत आहे.

राज्याला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून माेठी परंपरा आहे. सध्या जे चालले आहे ते राज्याला परवडणारे नाही. पूर्वीच्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कायम सांगतात. चांगले झाले तर त्यांनी केले, वाईट झाले तर ती आमची चूक असे चालणार नाही. किती दिवस आमच्या नावाने खडे फोडणार आहेत अशी टीका सुद्धा सत्ताधाऱ्यांवर केली होती आता या टीकेला सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: