…तर सुषमा अंधारे नावाच्या माकडिणीला चोप देऊ; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

 

मुंबा | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांना डिवचत आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला आता काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील सामील झालेल्या उपनेत्या आशा मामिडी यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत मामिडी यांनी सुषमा अंधारे यांना माकडिणीची उपमा देत टीका केली. ‘सुषमा अंधारे यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघावा आणि दुसऱ्यांना माकड म्हणावं. पक्षासाठी त्यांचे आतापर्यंतचे कुठले योगदान आहे? केवळ प्रसिद्धी मिळावी यासाठी त्या कुणावरही काहीही बोलत आहेत. अंधारे या फक्त टीका करत आहेत. सुषमा अंधारे फक्त सुपारी घेऊन काम करत करतात, असा आरोप मामिडी यांनी केला.

सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना आशा मामिडी यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी उजेड बाजूला केला आहे आणि अंधार जवळ केला. सुषमा अंधारे यांचा हिंदू धर्मावर टीका करणारा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सुषमा अंधारे यांना आम्ही रामायण आणि महाभारत ग्रंथ भेट देणार आहोत.

सुषमा अंधारेंना वेळ पडली, तर चोप देऊ. त्यांची पळता भुई थोडी होईल. महाराष्ट्रात त्यांना फिरू देणार नाही. सुषमा अंधारे या वाघीण नाही, तर माकडीण आहेत. त्या उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या शिवसेनेला संपवायला निघाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गटबाजी, असेही आशा मामिडी म्हणाल्या.

 

Team Global News Marathi: