…अखेर कालनिर्णय कॅलेंडरने या विषयावर दिले स्पष्टीकरण!

 

मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची तारीख न छापल्याने कालनिर्णय दिनदर्शिकेवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेरकरी सोशल मीडियावरून करत होते. यानंतर कालनिर्णयने स्पष्टीकरण देताना राज्याभिषेक दिनाचा उल्लेख राहून गेल्याचे म्हटले आहे. तसेच यापुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल असेही, म्हटले आहे.

संभाजीराजेंचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. तारखेनुसार छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची नोंद कालनिर्णयच्या 2023 च्या दिनदर्शिकेत नसल्यामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सनी पोस्ट्स करताना छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाची माहिती न देणारी दिनदर्शिका घेऊ नये असे म्हटले होते.
मात्र यावर कालनिर्णयने छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाची माहिती दिनदर्शिकेत न दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

कालनिर्णयने म्हटले की, ‘कालनिर्णय 2023 च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचं राहून गेले. यापुढे उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतिव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंचा ९ महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडवर वयाच्या २३ व्या वर्षी संभाजीराजेंचा राज्याभिषेक पार पडला होता.

Team Global News Marathi: