सुजात आंबेडकरांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञा पाठ आहेत का? -अखिल चित्रे

 

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्याला सर्व मशिदी बाहेर भोंगा लावून हनुमान चालिसा मंत्र वाजवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते यावरून वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर यांनी थेट राज ठाकरे यांना आपले पुत्र अमित ठाकरे यांना सर्व मशिदीबाहेर हनुमान चालिसा म्हणायला लावा अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली होती. आता या टीकेला मनसे विध्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी सुजात आंबेडकरांच्या या विधानावर टोला लगावला आहे.

सुजात आंबेडकरांना माझा एकचं प्रश्न आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या २२ प्रतीज्ञा न सांगता कोणताही पेपर हातात न घेता म्हणून दाखवाव्यात त्यानंतर इतरांना सल्ला द्यावा असा टोला अखिल चित्रे यांनी सुजात आंबेडकरांना लगावला होता. तसेच राज ठाकरे यांच्या विधानावर टीका करणाऱ्या शिवसेना पक्षाचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला होता.

पुढे सामना अग्रलेखावर टीका करताना सामनावीर अर्थात संजय राऊत यांना कॅमेरा दिसला की सकाळी-सकाळी ते सुरु होतात असा टोला नाव न घेता राऊतांना लगावला होता. पुढे भाजपाची बी टीम म्हणून टीका करणाऱ्यावर बोलताना ते म्हणाले की, इतके वर्ष तुम्ही (शिवसेना) कोणाचा भोंगा वाजवत होता असे नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला. तसेच आज संजय राऊत जी स्क्रिप्ट वाचत आहे ती बारामतीवरून येते का ? असा टोला सुद्धा अखिल चित्रे यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: