अजान’च्या निषेधार्थ लाऊडस्पीकरवर मनसे नेत्याने वाजवली ‘हनुमान चालिसा’, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड

मुंबई | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कांवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशारा दिला होता. या आदेशानंतर कल्याण शहरातील पक्ष कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली.

कल्याणमधील साई चौकातील पक्ष कार्यालयाबाहेर मनसेचे स्थानिक कार्यकर्ते जमले आणि त्यांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून मोठ्याने घोषणा दिल्या. तसेच त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या. मनसे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन करण्यास कार्यकर्ते कधीही मागेपुढे पाहणार नाहीत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्ता महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले, त्यानंतर ३ एप्रिललाच त्यांची सुटका करण्यात आली.

महेंद्र भानुशाली यांनी आपल्यावरील पोलिस कारवाईचा निषेध केला आणि ‘हनुमानजीची आरती’ केल्याबद्दल आम्हाला त्रास दिला जात असल्याचे सांगितले. भानुशाली म्हणाले की, हिंदूंच्या प्रार्थनांशी वैर असावे का? कोणाला याचा त्रास असेल तर त्यांनी कान बंद करून घरात बसावे. त्यांनी अशा गोष्टींना विरोध केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. या कारवाईनंतर २ तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. भानुशाली यांना ५५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता’च्या कलम १४९ अंतर्गत अशा कृत्याची पुनरावृत्ती करू नये म्हणून नोटीस बजावली आहे.

Team Global News Marathi: