उसाचा रस मधुमेहासाठी चांगला की वाईट? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे

उसाचा रस मधुमेहासाठी चांगला की वाईट? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे

मुंबई : उन्हाळा सुरु झाला आहे. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करु लागले आहेत, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळेल. तसेच लोक पाणी जास्त पिऊ लागतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच लोक उन्हाळ्यात आपला आहार देखील बदलतात आणि त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पाणी मिळेल आणि शरीर थंड राहण्यास मदत करेल.

उन्हाळ्यात लोक उसाचा रस पिणं हा देखील उष्णतेपासून वाचण्याचा चांगला पर्याय समजतात. परंतु तुम्हाला माहितीय थंडाव्यासाठीच नाही तर ऊसामुळे अनेक आजार देखील दूर राहण्यास मदत होते.

यकृत, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

साहजिकच गोड उसाचा रस हा पौष्टिक तसेच आरोग्यासाठी चांगला मानला जातो, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की, मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया

मधुमेहांच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?

उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेउ त्यांनी ऊसाच्या रसापासून दूर राहावे. ऊसाच्या रसामध्ये कोणतीही गोष्ट न मिसळता त्याच्यापासून रस काढला जातो, ज्यामुळे या रसात जास्त साखर आढळते. जे मधूमेह रुग्णांसाठी चांगले नाही. उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, पण साखरेचे प्रमाणही त्यात जास्त असते, त्यामुळे हा रस मधुमेहींसाठी आरोग्यदायी नाही.

एक कप (240 मिली) उसाच्या रसामध्ये 50 ग्रॅम साखर असते, म्हणजेच ती 12 चमचे असते. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. याचा अर्थ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो.

उसाच्या रसाचे इतर फायदे काय आहेत ते जाणून घ्या

उसाचा रस पचनास मदत करतो, उसाच्या रसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हा रस शरीराची पचनक्रिया बरोबर ठेवण्यासोबतच पोटाच्या संसर्गापासून देखील आपला बचाव करतो.

उसाचा रस दात मजबूत करतो

कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे उसाच्या रसात आढळतात, ज्यामुळे दात मजबूत होते. तसेच, ते दातांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. उसाच्या रसामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने श्वासाची दुर्गंध देखील थांबते.

उसाचा रस संसर्ग दूर ठेवतो

उसाच्या रसाचे सेवन केल्याने मूत्रमार्गाचे संक्रमण टाळण्यास मदत होते. विशेषत: लघवी करताना जळजळ होत असेल तर हा रस प्यायल्याने त्यापासून आराम मिळू शकतो.

उसाचा रस ऊर्जा वाढवतो

उसामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त असते जे शरीराला चांगली ऊर्जा देण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवत नाही. हे शरीरातील ग्लुकोजचे प्रकाशन सामान्य करते, जे साखरेची पातळी पुनर्संचयित करण्यात मदत करते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ग्लोबल न्यूज याची कोणतीही खातरजमा करत नाही.)

ग्लोबल न्युज नेटवर्क: